PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी 

HomeBreaking News

PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी 

Ganesh Kumar Mule Aug 06, 2024 9:48 PM

Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!
Pune Rain | महापालिका प्रशासनाने बाधित कुटुंबांचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी | डॉ. नीलम गोऱ्हे
Pune Municipal Corporation Holiday | मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी बाबत महापालिका आयुक्तांचे आदेश जारी! 

PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी

PMC Deputy Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नुकतेच नवीन ५ ते ६ उपायुक्त नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र त्यांना अजून खाते वाटप करण्यात आले नव्हते. कारण काही अधिकाऱ्यांचा महत्त्वाच्या खात्याबाबत आग्रह होता. त्यामुळे आयुक्त देखील संभ्रमात होते. अखेर महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी नवीन आणि जुन्या अशा १७ उपयुक्ताना विविध विभागाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये आयुक्तांनी काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. (Pune PMC News)
महापालिकेतील मिळकतकर विभाग, घनकचरा विभागाला खूप मागणी होती. त्यानुसार ही खाती कुणाला दिली जाणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र महापालिका आयुक्तांनी यात कुठलाही बदल केला नाही. घनकचरा विभाग उपायुक्त संदीप कदम यांच्याकडे ठेवला आहे. तर मिळकतकर विभाग हा उपायुक्त माधव जगताप यांच्याकडेच देण्यात आला आहे. याउलट आयुक्तांनी जगताप यांच्याकडील विविध विभागाची जबाबदारी कमी केली आहे. त्यांच्याकडील सुरक्षा, आकाशचिन्ह विभागाची जबाबदारी इतर उपयुक्तांना विभागून देण्यात आली आहे.
सर्वात जास्त उत्सुकता उपायुक्त चेतना केरूरे आणि आशा राऊत यांना कुठली जबाबदारी दिली जाणार, याबाबत होती. अखेर आयुक्तांनी हे गूढ उकलले आहे. केरुरे यांच्याकडे परिमंडळ ५ ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ ३, प्राथमिक शिक्षण विभाग तसेच माध्यमिक व तांत्रिक विभाग सनियंत्रण याची जबाबदारी दिली आहे.
तसेच सोमनाथ बनकर यांना उपयुक्ताचा दर्जा देत त्यांना अतिक्रमण आणि सुरक्षा विभागाची जबाबदारी दिली आहे. तर उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्याकडे विशेष पदाचा दर्जा देत आकाशचिन्ह परवाना विभाग आणि मुद्रणालय ची जबाबदारी देण्यात आली आहे.
– एकूण १७ उपायुक्त यांच्याकडे हे दिले आहेत विभाग 
१. जयंत भोसेकर – १. मोटार वाहन विभाग २. मागासवर्ग विभाग ३. परिमंडळ क्रमांक ४
२. नितीन उदास – १. समाज कल्याण विभाग. २. समाज विकास विभाग. ३. तक्रार निवारण विभाग (दिव्यांग)
३. अविनाश सपकाळ – परिमंडळ क्रं २
४. माधव जगताप – कर आकारणी व कर संकलन विभाग
५. विजय लांडगे – १. स्थानिक संस्था कर विभाग २. जनगणना विभाग
६. संदीप कदम – घनकचरा व्यवस्थापन विभाग
७. युनूस पठाण – झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग
८. किशोरी शिंदे – १. भांडार २. क्रीडा विभाग
९. सोमनाथ बनकर – १. अतिक्रमणे २. सुरक्षा विभाग
१०. प्रतिभा पाटील  – १. सामान्य प्रशासन विभाग २. भूसंपादन व व्यवस्थापन
११. महेश पाटील – १. दक्षता विभाग २. मालमत्ता व व्यवस्थापन विभाग ३. निवडणूक विभाग ४. आपत्ती व्यवस्थापन विभाग
१२. राजीव नंदकर – १. परिमंडळ क्रमांक १. २. प्रशिक्षण प्रबोधिनी ३. विधानमंडळ कामकाज समन्वय ४. पुणे मनपा वसाहती व्यवस्थापन
१३. संजय शिंदे – १. माहिती तंत्रज्ञान विभाग २. पर्यावरण विभाग ३. माहिती – जनसंपर्क सोशल मीडिया कक्ष
१४. चेतना केरूरे – परिमंडळ क्रं ५
१५. आशा राऊत –  १. परिमंडळ क्रं ३ २. प्राथमिक शिक्षण विभाग ३. माध्यमिक व तांत्रिक विभाग
१६. प्रशांत ठोंबरे – १. आकाशचिन्ह व परवाना विभाग २. मुद्रणालय
१७. सुनील बल्लाळ – १. सांस्कृतिक विभाग २. मंडई विभाग

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0