PMC Contract Employees Bonus | मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर | ठेकेदारांनी बोनस अदा करण्याचे कामगार उपायुक्तांचे आदेश
| सुनील शिंदेच्या आमरण उपोषणाला यश
PMC Contract Employees Bonus | पुणे | बोनस अधिनियमाच्या तरतुदीनुसार महापालिकेच्या कंत्राटी कामगाराना बोनस देणे ठेकेदारावर बंधनकारक आहे. त्यानुसार ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे आदेश कामगार उपायुक्त यांनी दिले आहेत. तसे पत्र कामगार उपयुक्तानी महापालिका आयुक्तांना दिले आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय कामगार नेते सुनील शिंदे यांनी देखील आपले आमरण उपोषण माघारी घेतले आहे. (Diwali Bonus News)
पुणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते म्हणजे पुणे मनपाचे साफसफाई, वेहिकल डेपो, स्मशानभूमी, कीटकनाशक, सुरक्षारक्षक, आरोग्यविभाग, पाणीपुरवठा, गार्डन अशा विविध खात्यातील सुमारे 10,000 कंत्राटी कर्मचारी.
हे सर्व अदृश्य हात राबतात त्यामुळेच पुणे शहरातील नागरिकांचे आयुष्य हे निरोगी राहत पण विरोधाभास असा की या सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन, युनिफॉर्म, सामाजिक सुरक्षा वेळेवर भेटत नाही किंवा भेटतच नाही. गेली 2 वर्ष राष्ट्रीय मजदूर संघटने मार्फत
सातत्याने कामगार उपायुक्त कार्यालय पुणे व पुणे मनपा प्रशासनाचा कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनस बाबत पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नव्हते. कंत्राटी कामगार अधिनियम 1971 नुसार दिवाळी बोनस
हक्काच असूनही मिळत नाही यासाठीच राष्ट्रीय मजदूर संघटने (RMS) मार्फत सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर गेले 3 दिवस चालू होते.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला व प्रश्न समजावून घेतले या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व इन्स्पेक्टर पाठवून प्रकरणाची चौकशी केली. यानंतर अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व माधव जगताप तसेच मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या सोबत बैठक झाली असता कामगार उपायुक्ता कडून कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याबाबत पत्र आणण्यास सांगितले. त्यानुसार कामगार उपायुक्ता कडून पत्र मिळाल्यानंतर मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी बोनस ॲक्ट नुसार ठेकदारांनी दिवाळी पूर्वी बोनस द्यावा अस लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदेंनी यांना दिलं. तसेच ठेकेदाराकडून बोनस देण्यास विलंब झाल्यास पुणे मनपा प्रशासन ठेकेदाराला उसने पैसे देऊन कामगारांना बोनस देतील असे आश्वासन दिले.
गेली 10 वर्ष कंत्राटी कामगारांना बोनस मिळत नव्हता संघटनेच्या लढ्यामुळे व कामगारांच्या एकाजुटीमुळे हा एतिहासिक निर्णय झाला असे राष्ट्रीय मजदुर संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपोषण सोडताना सांगितले.
यानंतर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आमरण उपोषण सुरक्षा अधिकारी केंजळे व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडलं.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचा प्रश्न हा लवकर मार्गी लागला. यावेळी कामगार एकजुटीची गाणी, तसेच बोनस आमच्या हक्काचा, आमचाच लढा न्यायासाठी अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस के पळसे त्याचबरोबर संघटनेचे विविध कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.