PMC CHS Scheme | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सेवानिवृत्त सेवकांना येणारी अडचण दूर झाली

Homeadministrative

PMC CHS Scheme | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सेवानिवृत्त सेवकांना येणारी अडचण दूर झाली

Ganesh Kumar Mule Dec 17, 2024 8:39 PM

Monkeypox virus | PMC | मन्कीपॉक्स बाबत पुणे महापालिका सजग | नायडू हॉस्पिटलला सतर्क राहण्याच्या सूचना 
Medical Insurance For PMC | अंशदायी वैद्यकीय योजना जाणार मेडिक्लेम कंपनीच्या ताब्यात! | महापालिका नेमणार ब्रोकर 
Fake Doctor case : ‘या’ प्रकरणामुळे महापालिका आयुक्तांना नोटीस!  : अधिकाऱ्याची पाठराखण केल्याचा ठेवला ठपका

PMC CHS Scheme | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सेवानिवृत्त सेवकांना येणारी अडचण दूर झाली

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना (PMC Employees) सेवानिवृत्त झाल्यावर तत्काळ अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेचा (CHS) लाभ दिला जात नव्हता. पेन्शन (PMC Pension) सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना योजनेच्या कार्ड साठी रखडत बसावे लागते. मात्र आता कर्मचाऱ्यांना या योजनेचा सेवानिवृत्त झाल्यावर देखील तत्काळ लाभ मिळू लागला आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारातून १ टक्का रक्कम घेतली जात आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने यावर अंमल सुरू केला आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आजी माजी नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. या आरोग्य योजनेचा सेवकांना चांगला फायदा होतो. मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना, ज्यांना अजून पेन्शन सुरू झाली नाही त्यांना या योजनेचे कार्ड दिले जात नाही. काही तांत्रिक कारणाने पेन्शन मिळण्यास विलंब होतो. आरोग्य विभागाच्या या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. (Pune PMC News)

दरम्यान सफाई कर्मचारी समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त (ई.) यांचे अध्यक्षते खाली नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी, प्रश्न यांची चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी असा मुद्दा मांडला की, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ सेवानिवृत्त सेवकांना दिला जात नसल्याने त्यानां खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास अत्यंत हालअपेष्टा व खर्च सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर लगेच त्यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ सुरु करावा. अशी मागणी बैठकीत करण्यात आली होती.

त्यानुसार बैठकीत सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना पेन्शन सुरु होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता सेवकांच्या शेवटच्या महिन्यातील वेतनाच्या मूळ वेतन, महागाई भत्ता यावर १% रक्कम आकारून त्यांना वैद्यकीय सहाय्य योजना लगेच लागू करावी असा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार याबाबत आरोग्य विभागाकडून अंमल करणे सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू लागला आहे. असे डॉ वावरे यांनी सांगितले.
—-

सेवकांना पेन्शन सुरु होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता सेवकांच्या शेवटच्या महिन्यातील वेतनाच्या मूळ वेतन, महागाई भत्ता यावर १% रक्कम आकारून त्यांना वैद्यकीय सहाय्य योजना लगेच लागू करावी असा निर्णय अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार यावर आम्ही अमलबजावणी करणे सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जातोय.

डॉ संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0