PMC Care | आषाढी वारी सोहळा : पीएमसी केअरच्या वतीने ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन
| “माझी वारी” वेशभूषा आणि छायाचित्र स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
PMC Care – (The Karbhari News Service) – पीएमसी केअर हा पुणे महानगरपालिकेचा अधिकृत सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म (मोबाईल अॅप्लिकेशन आणि वेब पोर्टल) आहे. पुणेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच संतविचारांचा प्रसार व्हावा यासाठी पीएमसी केअर’ यांच्या वतीने दि. १९ जून ते ७ जुलै २०२५ दरम्यान ‘माझी वारी’ आणि आषाढी वारी विशेष छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Aashadhi Wari 2025)
या स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे
‘माझी वारी’ वेशभूषा स्पर्धा
पुणे शहरामधील शाळांमध्ये आषाढी वारी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याअंतर्गत विद्यार्थी संतांची वेशभूषा करून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. ‘माझी वारी’ या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे संतांच्या वेशभूषेतील छायाचित्रे दिलेल्या लिंकवर अपलोड करणे अपेक्षित आहे. सदर छायाचित्रांचे तज्ञांकडून परीक्षण करण्यात येईल. स्पर्धेमध्ये १ ते ५ वर्षे, ६ ते १० वर्षे, ११ ते १६ वर्षे या प्रमाणे गट असणार आहेत. गटानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येईल. इतर सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
आषाढी वारी विशेष छायाचित्र स्पर्धा
या स्पर्धेमध्ये नागरिकांनी त्यांनी काढलेली वारीची छायाचित्रे दिलेल्या लिंकवर अपलोड करणे अपेक्षित आहे. सदर छायाचित्रांचे तज्ञांकडून परीक्षण करण्यात येईल. तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येईल. ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रक्रिया :
१.स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा https://fxurl.co/CARE ह्या लिंकवर जाऊन पीएमसी केअर ॲप डाऊनलोड करा.
२. नागरिक म्हणून नोंदणी करा.
३. सर्व्हे या टॅबवर क्लिक करून स्पर्धेची लिंक ओपन करा.
४. छायाचित्रे अपलोड करा.
मागील वर्षीदेखील छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या वर्षदिखील जास्तीत जास्त नागरिक आणि विद्यार्थी यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
COMMENTS