PMC Building Devlopment Permission | बांधकाम विकसन शुल्कातून पुणे महापालिकेला 2601 कोटींचा महसूल! 

Homeadministrative

PMC Building Devlopment Permission | बांधकाम विकसन शुल्कातून पुणे महापालिकेला 2601 कोटींचा महसूल! 

Ganesh Kumar Mule Mar 31, 2025 7:53 PM

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 1283 कोटींचे उत्पन्न | बुधवारी मिळाले 15.26 कोटी
PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण
PMC Property tax Department | प्रशासन अधिकारी संजय शिवले यांना प्रॉपर्टी टॅक्स विभागातून केले कार्यमुक्त!

PMC Building Devlopment Permission | बांधकाम विकसन शुल्कातून पुणे महापालिकेला 2601 कोटींचा महसूल!

 

PMC Building Devlopment Permissions – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेला बांधकाम विकसन शुल्कातून  (Pune Municipal Corporation Building Permission Department) तब्बल २६०१ कोटींचा महसूल मिळाला आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हा महसूल मिळाला आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बांधकाम विकसन शुल्काने (PMC Devlopment Charges) एवढी मजल मारली आहे. कारण मिळकतकर (PMC Property tax Department) विभागाला देखील बांधकाम विभागाने मागे टाकले आहे. त्यामुळे बांधकाम विकसन शुल्क हा महापालिकेचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत झाला आहे. असे मानले जाऊ लागले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

या वर्षभरात बांधकाम विभागाने तब्बल ३३५९ नवीन बांंधकामांना परवानगी दिली आहे. मिळकतकर हा उत्पन्नाचा एकमेव मुख्य स्त्रोत समजला जात होता. मात्र, पहिल्यांदाच बांधकाम विकास विभागाने विक्रमी उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. विभागाला आयुक्तांनी अंदाजपत्रकात २४९२ कोटी मिळवण्याचा उद्देश दिला होता. मात्र विभागाने त्याही पुढे मजल मारत २६०० कोटीहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका हद्दीमधील बांधकाम विकसन प्रस्तावांच्या मंजुरी पोटी जमिन विकसन शुल्क, बांधकाम विकसन शुल्क व विविध प्रिमियम चार्जेस, इ. शुल्क जमा करण्यात येतात. जमिन विकसन शुल्कव बांधकाम विकसन शुल्क यापोटी जमा करण्यात येणा-या हिश्शा इतकेच शुल्क मे शासनासाठी जमा करण्यात येतात. तसेच अतिरिक्त चटई क्षेत्र, पुणे इन्फ्रास्ट्रक्चर फंड, विशेष इमारती, उदा. आय.टी. बिल्डींग, टी. ओ. डी. मधील क्षेत्रामधील इमारती इ. तत्सम प्रस्तावासाठी जमा करण्यात येणारे एफ. एस. आय. मधील ५०:५० किंवा नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शुल्क शासनाकडे जमा करण्यात येतात.

बांधकाम विभागास मिळालेले उत्पन्न

२०१९-२० – ७६९ कोटी
२०२०-२१ – ५०७ कोटी
२०२१-२२ – २०९५ कोटी
२०२२-२३ – १६३५ कोटी
२०२३-२४ – २४०७ कोटी
२०२४-२५ –  २६०१ कोटी