PMC Building Development Department | बालेवाडी आणि पाषाण परिसरात महापालिकेची अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई | २१ हजार चौरस फूट बांधकाम पाडले

बालेवाडी आणि पाषाण परिसरात पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई

Homeadministrative

PMC Building Development Department | बालेवाडी आणि पाषाण परिसरात महापालिकेची अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई | २१ हजार चौरस फूट बांधकाम पाडले

Ganesh Kumar Mule Aug 14, 2024 4:28 PM

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम
Amol Balwadkar | बाणेर परिसरात निवेदन जाळून केले आंदोलन |अमोल बालवडकर यांचा आक्रमक पवित्रा 
Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

PMC Building Development Department | बालेवाडी आणि पाषाण परिसरात महापालिकेची अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई | २१ हजार चौरस फूट बांधकाम पाडले

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – बालेवाडी येथील ( बालेवाडी दसरा चौक परिसर व बालेवाडी हाय स्ट्रीट परिसर) येथे दि.14/08/2024रोजी पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई नियोजित करण्यात आलेली होती. (Pune PMC News)

सदर कारवाई मधे सुमारे 14000 चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता,
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने दोन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण केली.
——

पाषाण कीर्ति गार्डन परिसरातील तीन विनापरवाना फार्म हाऊस वर पुणे महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या वेळी सुमारे 7000 चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.

हे फार्म हाऊस HEMRL च्या प्रतिबंधित क्षेत्रामधील असून जागेवर बांधकाम सुरू होते.
या ठिकाणी आज पर्यंत 8 फार्म हाऊस वर कारवाई करण्यात आली असून अजून 12 फार्म हाऊस वर कारवाई बाकी आहे. पावसाळ्या नंतर या फार्म हाऊस जाॅ कटर मशीन चे मदतीने कारवाई करण्यात येणार आहे.
आज दोन गॅस कटर,1 JCB,1ब्रेकर च्या मदतीने कारवाई करण्यात आली