PMC Bhavan Rachana Department | शेवटी महापालिकेतील अडगळीच्या सामानाची भवन रचना कार्यालयाने घेतली दखल | सर्व खाते प्रमुखांना दिले आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) मुख्य इमारती मधील पॅसेज मध्ये अडगळीचे सामान पडलेले दिसून येते. गेल्या कित्येक महिन्यांपासून याची दखल घेतली जात नव्हती. अखेर भवन रचना विभागाने याची दखल घेतली आहे. शिवाय सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत की, हे सामान त्वरित हलवले जावे. विभागाचे प्र अधिक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे यांनी हे आदेश जारी केले आहेत. (PMC Bhavan Rachana Department)
महापालिकेच्या मुख्य इमारतीत विविध कार्यालयासमोर पॅसेज मध्ये अडगळीचे सामान पडलेले दिसून येते. यामध्ये जुने फर्निचर, दस्तऐवज, कागदपत्रे ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अग्निशमन विषयक अडचण निर्माण होण्याची भीती आहे. तसेच आरोग्य विषयक समस्या देखील उद्भवू शकतात. असे असतानाही विविध विभागाकडून हे सामान हलवण्यात आले नाही. बऱ्याच कार्यालयाचे नविनीकरण केले जाते. त्यावेळी सामान पॅसेज मध्ये ठेवले जाते. कार्यालय नवीन झाल्यानंतर मात्र या जुन्या सामानाकडे दुर्लक्ष केले जाते.
याची गंभीर दखल भवन रचना विभागाने घेतली आहे. तसेच सर्व विभागप्रमुखांना आदेशित केले आहे कि, हे सामान त्वरित हलवण्यात यावे. ही बाब सर्व विभागप्रमुख किती गंभीरपणे घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS