PMC Assistant commissioner | महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून सहायक आयुक्त यांच्या बदल्या!
| चारुदत्त इंगुले यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सहायक आयुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल केला आहे. या बाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. दरम्यान जेजुरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांची पुणे महापालिकेत सहायक आयुक्त पदी प्रति नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. ( Pavneet Kaur IAS)
अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार इंद्रायणी करचे यांना कर आकारणी आणि कर संकलन विभागाची जबाबदारी दिली आहे. टैक्स विभागातील अस्मिता तांबे- धुमाळ यांना वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपवली आहे. वारजे क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या सोमनाथ आढाव यांना मालमत्ता व व्यवस्थापन विभाग दिला आहे. बाळासाहेब ढवळे पाटील यांना शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय सोपवले आहे. शिवाजीनगर मध्ये काम करणारे तिमय्या जंगले यांना स्थानिक संस्था कर कार्यालय दिले आहे.
सिंहगढ रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रज्ञा पोतदार यांना घनकचरा व्यवस्थापन विभाग दिला आहे. तर दिपक राऊत यांच्याकडे प्रॉपर्टी टैक्स सहित सिंहगढ रोड चा अतिरिक्त पदभार दिला आहे. चारुदत्त इंगुले यांच्याकडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. प्रकाश बालगुडे यांची अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागात बदली केली आहे. त्यांच्याकडील कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी उप अभियंता प्रदीप आव्हाड (प्रभारी पदभार) याना दिली आहे.
विजय नायकल यांच्या कडे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय सोपवले आहे. तर त्यांच्याकडील कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय उप अभियंता सुहास जाधव (प्रभारी पदभार) यांच्या कडे दिले आहे. घनकचरा विभाग कडील नलिनी सूर्यवंशी यांना क्रीडा विभाग देण्यात आला आहे.

COMMENTS