PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 

Homeपुणेsocial

PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 

गणेश मुळे Feb 12, 2024 2:32 PM

PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते संपन्न! 
  First Prize to Hindustan Petroleum Corporation Limited in Pune Municipal Corporation’s 42nd Fruits, Flowers and Vegetables Exhibition!
PMC Garden Department | पुणे महापालिकेचे 42 वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 10 आणि 11 फेब्रुवारीला!

PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक!

 

PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनानिमित्ताने (PMC 42th Fruit, flowers and vegetable competition and exhibition) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मध्ये ११०० स्पर्धकांनी विविध विभागामध्ये एकूण ३००० प्रवेशिका घेतलेल्या होत्या.  प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. (Hindustan Petroleum Corporation Limited) यांना १२०००/- धनादेश व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक – श्री शिवाजी प्रीग्रेटरी मिलीटरी स्कूल, पुणे यांना १००००/- धनादेश व ट्रॉफी व तृतीय पारितोषिक – श्रेया लॅन्डस्केपिंग अॅन्ड गार्डनिंग, पुणे यांना ९०००/- धनादेश व ट्रॉफी असे पारितोषिक मिळालेले आहे. अशी माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. (Pune Municipal Corporation 74th Anniversary)

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने ४२ वे फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शन छ. संभाजीराजे उद्यान, येथे आयोजित करण्यात आलेले होते. सदर प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार रोजी पार पडला.
पारितोषिक वितरण समारंभास मा.डॉ.श्री. दीपक टिळक, कुलपती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य सल्लागार, दि रोझ सोसायटी ऑफ पुणे, संपादक, केसरी वृत्तपत्र व मा.डॉ.श्री. सिद्धार्थ धेंडे,माजी उपमहापौर,पुणे, श्री.विक्रम कुमार, प्रधानाचार्य हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन, पुणे, श्री. ज्ञानेश्वर मोकळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) (सेवानिवृत्त), मा.श्री.गणेश शिर्के अध्यक्ष, दि रोझ सोसायटी ऑफ पुणे,  श्री. अरुण पाटील, माजी अध्यक्ष, दि रोझ सोसायटी ऑफ पुणे व मा.श्री. निलेश आपटे- सेक्रेटरी, दि रोझ सोसायटी ऑफ पुणे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते व सदर कार्यक्रमास मा. संदीप काळे, माजी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य,पुणे मनपा तसेच पुणे महानगरपालिकेचे श्री.राकेश विटकर, प्र. मुख्य सुरक्षा अधिकारी, मा. अशोक घोरपडे,मुख्य उद्यान अधिक्षक तसेच मा.संतोषकुमार कांबळे, उद्यान अधिक्षक, श्री.स्नेहल हरपळे,श्री.रत्नाकर करडे, श्रीमती,श्रुती नाझीरकर, सहा. उद्यान अधिक्षक व उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच हे उपस्थित होते.

the karbhari - pmc garden department

प्रदर्शनात विविध 12 विभाग 

नागरिकांना निसर्गातील विविधता पाहता यावी व त्यामधून त्यांचे मध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी व पुणे मनपाच्यावतीने पुणे शहरात सुरु असलेल्या ” माझी वसुंधरा ” प्रकल्पाच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवा याच उद्देशाने पुणे मनपाच्यावतीने दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे एकूण १२ विभाग होते, त्यामध्ये २१५ उपविभाग असून, त्यामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाब पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड डेकोरेशन, बचत गटातील महिलांसाठी, फळे भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिप, वेण्या प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते. तसेच निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आलेले होते. विविध प्रकारचे डेलिया आर्किड,
६, ॲन्धुरिअम, जरबेरा, गुलाब, कानॅशन इ. प्रकारची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या होत्या.

: विविध पारितोषिकांचे वितरण 

प्रदर्शनातील विभाग क्र. ३- गुलाब पुष्प मांडणी विभागाचे पारितोषिक वितरण समारंभ दि रोझ सोसायटी ऑफ पुणे यांचे वतीने करण्यात
आला, यामध्ये मा.डॉ.श्री.दीपक टिळक, कुलपती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य सल्लागार, दि रोझ सोसायटी ऑफ पुणे, संपादक, केसरी वृत्तपत्र यांचे शुभहस्ते “फुलांचा राजा” व “फुलांची राणी” तसेच “राजकन्या” व “राजकुमार” असे चारही पारितोषिक श्री. मंचर के ईराणी यांना तर, श्री. साहिल ठोंबरे यांनी गुलाबातील उल्लेखनीय कार्याबद्दल “कै. लक्ष्मीबाई अनंतराव नाईक रजतपदक प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये प्रामुख्याने घनकचरा विभाग, पर्यावरण केंद्र, पुष्करणी, निसर्ग सेवक, कागजगिरी, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, काष्ठ शिल्प, फ्रेंड्स ऑफ बोन्साय, ब्रम्ह कुमारीज विश्व विद्यालय, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्कटिक्ट इ. संस्था सहभागी झालेल्या असून या प्रदर्शनामध्ये बोन्साय, फीचर्स गार्डन पुष्करणीच्या विविध पुष्परचना तसेच पर्यावरणपूरक वाद्य निर्मितीची संकल्पना इ. नागरिकांना पहावयास मिळाले.

the karbhari - pmc sambhaji park pune

प्रदर्शनात विविध देखावे 

सदर प्रदर्शनामध्ये उद्यान विभागामार्फत मुख्य प्रवेशद्वार सुशोभिकरण, मुख्य मंडपमधील फुलांचे फुलपाखरू सुशोभिकरण, मिकी माऊस फुलांचे सुशोभिकरण हार्ट शेप सेल्फी पॉईन्ट फुलांचे सुशोभिकरण, वृक्षदिंडी देखावा, माझी वसुंधरा देखावा, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंचा नैसर्गिक देखावा, फ्लॉवर व्हॅली देखावा, वॉटर फॉल गार्डन, ड्रीम झु पार्क सफारी देखावा, फ्लाइंग टी पॉट देखावा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्व, उद्यान दर्शन बस देखावा तयार करण्यात आलेला होता.

 

सव्वा लाख लोकांनी घेतला प्रदर्शनाचा लाभ 

प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडील एकूण ३५० माळी, बिगारी सेवकांचे बहुमोल सहकार्य लाभलेले आहे. नागरिकांसाठी रोपे, खते, अवजारे इ. वस्तू उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ७५ स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आलेले होते. सदरचे प्रदर्शन पाहण्याचा शहरातील अंदाजे १ ते १.२५ लक्ष इतक्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे.