PMC 74 th Anniversary | महापालिका वर्धापनदिन निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनात काष्ठशिल्प, जुन्या नाण्यांचा संग्रह!

HomeपुणेPMC

PMC 74 th Anniversary | महापालिका वर्धापनदिन निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनात काष्ठशिल्प, जुन्या नाण्यांचा संग्रह!

गणेश मुळे Feb 14, 2024 1:33 PM

PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 
PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या वर्धापनदिन निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी! 
Pune Municipal Corporation (PMC): The custodian of Pune’s heritage and the architect of Pune’s promising future!

PMC 74 th Anniversary | महापालिका वर्धापनदिन निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनात काष्ठशिल्प, जुन्या नाण्यांचा संग्रह!

 

PMC 74th Anniversary | पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त (Pune Municipal Corporation Anniversary), पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला मंच यांचे वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालन येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune PMC News)

या प्रदर्शनात फोटोग्राफी, पेंटिंग्स, हाताने तयार केलेल्या मूर्ती, काष्ठशिल्प, जुन्या नाण्यांचा संग्रह, इत्यादी साहित्य पाहण्याची संधी दर्शकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधी त सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. तरी सदर प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन सांस्कृतिक कलामंच च्या वतीने करण्यात आले आहे.

या  प्रदर्शनामध्ये महानगरपालिकेमधील खालील अधिकारी/सेवकांनी सहभाग घेतला आहे.

निशा चव्हाण, सुरेश परदेशी,  संदीप खलाटे, अंकुश कानगुडे, राहुल वाघमारे, देवेंद्र भागवत, स्वाती सिद्धूल, ललित बोडे, अनिल चव्हाण, सुधाकर मेमाणे, प्रकाश उघडे, नरेंद्र दीक्षित, शितल वाघ, करुणा लघाडे.