PMC 23 Included Villages | उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे समाविष्ट 23 पैकी 12 गावांची जबाबदारी | महापालिका आयुक्तांनी विश्वास दाखवत सोपवली मोठी जबाबदारी
PMC 23 Included Villages | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांची फौजच दिली आहे. यामध्ये ४ उपायुक्त, ८ सहाय्यक आयुक्त आणि १६ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपायुक्त आशा राऊत (PMC Deputy Commissioner Aasha Raut) यांच्याकडे १२ गावांची जबाबदारी दिली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी राऊत यांच्या कामावर विश्वास दाखवत ही जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे. (PMC Pune)
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार महाळुंगे, सूस, बावधन-बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी- बुद्रुक, नहे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी,
भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली अशा तेवीस तत्कालीन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे. सदर तत्कालीन समाविष्ट तेवीस ग्रामपंचायतीचे सर्व कार्यालयीन कामकाजाशी निगडीत कागदपत्रे विविध क्षेत्रिय कार्यालय यांनी ताब्यात घेतलेली आहेत.
पण या गावातील पाणी, कचरा, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटार, पथदिवे यांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान आयुक्तांनी या गावांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द व लोकसंख्या लक्षात घेत २३ गावांची जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. वाघोली, बावधन बुद्रूक ही दोन्ही गावे मोठी असल्याने या गावांसाठी एक उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, दोन संपर्क अधिकारी आहेत. तर उर्वरित गावांसाठी स्वतंत्र अधिकारी न देता उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दोन पेक्षा जास्त गावांची जबाबदारी दिली आहे.
उपायुक्त आणि २३ गावांची जबाबदारी
- किशोरी शिंदे – वाघोली
- संतोष वारुळे – म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रूक
- आशा राऊत – कोपरे, कोंढवे-धावडे, सणसनगर, नांदोशी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी
- प्रसाद काटकर – औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रूक, गुजर-निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी
- ——-