Pink E Rickshaw | आम्ही शासनाच्या लाडक्या बहिणी नाहीत का? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

Homeadministrative

Pink E Rickshaw | आम्ही शासनाच्या लाडक्या बहिणी नाहीत का? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

Ganesh Kumar Mule Dec 30, 2024 8:06 PM

Pradhanmantri Matru Vandana Yojana | तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ESIC | अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना ESIC चे लाभ लागू करावेत
Ladki Bhahin Yojana |आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण कधी होणार? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

Pink E Rickshaw | आम्ही शासनाच्या लाडक्या बहिणी नाहीत का? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

 

Anganwadi Sevika – (The Karbhari News Service) – लाडकी बहिण, पिंक (गुलाबी) ई रिक्षा असो की विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात नेहमी आम्हा अंगणवाडी सेविकांची शासनाला आठवण येते; परंतु आमचे प्रश्न, अडीअडचणी उपस्थित होतात. त्यावेळी मात्र आम्ही लाडक्या बहिणी नसतो असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविका उपस्थित करत आहेत. (Pune News)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल ॲप द्वारे पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता. परंतु कमीत कमी प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी 50 हून जास्त फॉर्म भरले आहेत पण एकीसही अद्याप हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही.

यासोबतच अंगणवाडी सेविकांना पिंक E रिक्षाचे फॉर्म भरण्याचीही अलिखीत सक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून केली जात आहे. ज्याला गरज नाही किंबहुना काही परिसरात अशा प्रकारचे कोणतेही गरजवंत महिला नाहीत त्यांना सक्ती करणे व त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणे हे अंगणवाडी सेविकांनाही मानसिक दृष्ट्या त्रासदायक आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून अंगणवाडी सेविकांवर अन्याय करणारी आहे असे राष्ट्रीय मजदुर संघाचे (RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.

पुढे तेम्हणले की यापूर्वी आधीपासूनच अंगणवाडी सेविकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. जर शासनाच्या महिला व बालविकास विभागाने सकारात्मक विचार करून योग्य ते आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे व या धोरणाचा आपण फेरविचार करावा अन्यथा अंगणवाडी सेविका महिला व बालविकास विभागा कर्यालयासोमर आंदोलन करण्यात येईल.