PCMC SRA | Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

HomeपुणेBreaking News

PCMC SRA | Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

Ganesh Kumar Mule Sep 24, 2023 6:18 AM

MLC Election | जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल
Pune Airport New Terminal News | विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या | उपमुख्यमंत्री अजित पवार
Deepak Dalvi : Ajit Pawar : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील भ्याड शाई हल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध

PCMC SRA | Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

| शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा-अजित पवार

PCMC SRA | Ajit Pawar |  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी (SRA Nigadi) येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh), पोलीस आयुक्त विनय चौबे (IPS Vinay Choubey), सुनील नहार आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सदनिकातील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली. इमारतीच्या परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.
श्री.पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडी धारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्या नीटपणे वापराव्यात. घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील असा सर्वांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

*श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट*

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला (Moraya Gosavi samadhi mandir) भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि श्री गणेशाची आरती केली. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.
000