पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार
| चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात गेल्याने पुण्यात भाजप आक्रमक दिसणार
पुण्यातील एकमेव मंत्रिमंडळ सदस्य म्हणून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पाटील हे त्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांना थेट आव्हान देणार अशी चिन्हे आहेत. आगामी काळात दोन मोठ्या महापालिका निवडणुका होणार आहेत. यावेळी भाजप आक्रमक पाहायला मिळणार, असे चित्र दिसते आहे.
मंगळवारी महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे जिल्ह्यातील एकमेव निवडून आलेले आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले पाटील हे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात एक प्रथा आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक मंत्र्यांची नियुक्ती केली जाते आणि त्या जिल्ह्याच्या विकासाकडे मंत्र्याचे वैयक्तिक लक्ष असावे, असे अपेक्षित असते. सामान्यत: राज्य मंत्रिमंडळातील एखाद्या विशिष्ट जिल्ह्यातील मंत्र्याला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाते. राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नसेल तर बाहेरच्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते.
2019 मध्ये, पाटील यांना सहा महिन्यांसाठी पुण्याचे पालकमंत्री करण्यात आले होते. गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि राज्यमंत्रीपद सोडले होते. त्यामुळे पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. पाटील पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले तर पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार पडेपर्यंत अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते असून जिल्ह्यातील बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अशाप्रकारे, पवार घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पाटील हे त्यांच्या पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ल्यात पवारांना थेट आव्हान उभे करतील, जे पीएमसी आणि पीसीएमसी या दोन्ही निवडणुका घेण्यास सज्ज आहेत. 2017 ते 2022 पर्यंत चाललेल्या मागील टर्ममध्ये प्रथमच भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळे आता भाजप आक्रमक होईल, असे मानले जात आहे.