Parvati Assembly Constituency | पर्वतीत वाटले जाताहेत “हिरे”! जाणून घ्या काय आहे प्रकार!
Aba Bagul Parvati – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील पर्वती विधानसभा निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावर आली आहे. या मतदारसंघात अपक्ष उभे राहिलेल्या आबा बागुल यांचीच चर्चा जास्त आहे. आबांनी प्रचारात मुसंडी मारत आपल्या नवनवीन कल्पनांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Vidhansabha Election 2024)
आबा बागुल यांच्याकडून नुकतेच पर्वती मतदारसंघात “हिरे” वाटण्यात आले. तुम्ही म्हणाल, हा काय प्रकार? तर असे आहे कि, आबा बागुल यांची निशाणी ही हिरा आहे. शिवाय नाविन्यपूर्ण कल्पना लढवण्यात आबा बागुल हे नेहमीच अग्रेसर असतात. तर असे निशाणी असलेले “किचैन” बागुल यांनी मतदारसंघात नागरिकाना भेट दिले आहेत. त्यामुळे या हिरे वाटपाची चर्चा पर्वतीत जोरदार आहे.
पर्वती मतदारसंघावर पूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. कारण इथे तिरंगी लढत होत आहे. यामध्ये भाजपकडून आमदार माधुरी मिसाळ, शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी नगरसेविका अश्विनी कदम आणि अपक्ष आबा बागुल अशी ही लढाई होत आहे. बागुल यांना काँग्रेसकडून तिकीट न दिल्याने बागुल यांनी स्व अस्तित्वावर लढण्याचा निर्णय घेतला होता. प्रचारात बागुल यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यानुसार बागुल यांना लोकांचे समर्थन मिळताना दिसत आहे.
COMMENTS