जिजामा सन्मान पुरस्काराचे आयोजन
क्रीडा भारती पुणे महानगरच्या वतीने ‘ जिजामॉं सन्मान पुरस्कार २०२३ ‘ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा सत्कार करण्यात आला.
सदाशिव पेठेतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे भावे हायस्कूलच्या गावडे सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात ध्यानचंद पुरस्कार विजेते, बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर श्री.अभिजीत कुंटे, टेनिसच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सौ.राधिका तुळपुळे-कानिटकर, अखिल भारतीय क्रीडा भारतीचे महामंत्री श्री.राज चौधरी, कोषाध्यक्ष श्री.मिलींद डांगे, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा भारतीचे अध्यक्ष श्री. विजय पुरंदरे, क्रीडा भारती पुणे महानगरचे मंत्री श्री. विजय रजपूत, अध्यक्ष श्री. शैलेश आपटे सर, ॲड.प्रसन्नदादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिमनॅस्टिक खेळाडू रोमा दिलीप जोगळेकर यांच्या माता श्रीमती नेहा दिलीप जोगळेकर, ॲथलेटिक्स खेळाडू स्वाती हरिभाऊ गाढवे यांच्या माता श्रीमती सुनंदा हरिभाऊ गाढवे, स्विमर स्वेजल शैलेश मानकर यांच्या माता श्रीमती सोनी शैलेश मानकर, बुद्धिबळ खेळाडू हर्षित हर्निष राजा यांच्या माता श्रीमती राखी हर्निष राजा, मल्लखांब खेळाडू कृष्णा राजेंद्र काळे यांच्या माता श्रीमती आशा राजेंद्र काळे, व्हॉलीबॉल खेळाडू प्रियांका प्रेमचंद बोरा यांच्या माता श्रीमती आशा प्रेमचंद बोरा, जिमनॅस्टिक खेळाडू श्रद्धा साईनाथ तळेकर यांच्या माता श्रीमती शीतल साईनाथ तळेकर, स्विमर हर्ष सुनील बाबर यांच्या माता श्रीमती कल्पना सुनील बाबर, स्विमर तेजश्री संजय नाईक यांच्या माता श्रीमती भाग्यश्री संजय नाईक, स्केटिंग खेळाडू स्वराली आशुतोष देव यांच्या माता श्रीमती नमिता आशुतोष देव या सर्व पुरस्कार विजेत्या मातांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.