पुण्यात हक्काचे घर मिळण्याची संधी
: म्हाडा लवकरच काढणार सोडत
पुण्यात आता तुमच्या हक्काच घर घेण्याच स्वप्न साकार होणार आहे. पुणे विभागातील नागरीकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना त्यांचं हक्काच घराचं स्वप्न साकारता येईल. बाबत येत्या दिवसात एक अधिकृत जाहिरातसुद्धा जाहीर काढली जाणार आहे. अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यात प्रामुख्याने येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, मुढंवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, वाघोली, पाषण खराडी, वाकड, थेरगाव, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि पुनावळे या भागात म्हाडा या ४,७४४ घरांची सोडत काढणार.
COMMENTS