Heritage Walk | आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!  | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा 

HomeपुणेBreaking News

Heritage Walk | आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!  | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा 

Ganesh Kumar Mule Feb 11, 2023 8:59 AM

PMC Election | Final voter list | अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 21 जुलै पर्यंत अवधी  | राज्य निवडणूक आयोगाचे आदेश 
Pune DP | पुण्याच्या गरजांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार करावा
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा २९ ऑक्टोबर ला  सन्मान!

आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!

| पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा

पुणे | पुणे महापालिका नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देते. महापालिकेकडून खूप साऱ्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जेणेकरून नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये. महापालिकेकडून उद्यानाच्या तिकीट ची सुविधा देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर आता महापालिकेकडून हेरिटेज वॉक चे तिकीट देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. याबाबतचे पोर्टल तयार करण्यात आले असून लवकरच नागरिकांना याचा लाभ देण्यास सुरुवात होईल. अशी माहिती महापालिकेच्या संगणक आणि भवन विभागाकडून देण्यात आली. (Heritage walk)
पुणे शहराला समृद्ध असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे देश विदेशातील लोक पुण्याकडे आकर्षित होतात. साहजिकच पुणे शहर हे पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. पुणे शहरात शनिवारवाडा, लाल महल, विश्रामबागवाडा सारख्या महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. याची पर्यटकांना इत्यंभूत माहिती मिळावी, याकरता पुणे महापालिका प्रशासनाकडून हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरु केली. त्याला देश आणि विदेशातील पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. महापालिकेकडून 9-10 स्थळासाठी हेरिटेज वॉक ची संकल्पना सुरु केली. यामध्ये शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, कसबा गणपती,  लाल महाल, नाना वाडा,  तुळशीबाग राममंदिर, महात्मा फुले  मंडई, श्रीमंत दगडूशेठ गणपती, बेलबाग मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर,  भाऊसाहेब रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी मंदिर या स्थळांचा समावेश आहे. (PMC pune)
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार या स्थळांना भेट देण्यास आलेल्या पर्यटकांना संबंधित वास्तूचे दर्शन घडवून त्याची सविस्तर माहिती दिली जाते. यासाठी नागरिकांना तिकीट दिले जाते. त्याचे दर देखील महापालिका मुख्य सभेने ठरवून दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये, प्रौढ नागरिकांना 300 रुपये तर विदेशी नागरिकांना 500 रुपये तिकीट आकारण्यात येते. दर शनिवारी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. (Pune municipal corporation)
—–
सद्यस्थितीत हेरिटेज वॉक चे तिकीट ऑफलाईन दिले जाते. मात्र आगामी काळात हे तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन साठी देखील तिकीट दर ऑफलाईन सारखाच राहणार आहे. ऑनलाईन तिकिटाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या वेळेचे schedule ठरवून दिले जाईल. यासाठीचे पोर्टल तयार करण्यात आले असून लवकरच त्यावर अंमल केला जाईल.
राहुल जगताप, सांख्यिकी व संगणक विभाग प्रमुख 
—-