आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच!
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आबा बागुल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
पुणे : नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आबा बागुल नेहमीच पुढाकार घेतात. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आबांनी आम्हाला देशप्रेमाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या अगोदर देखील आबांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस गटनेता आबा बागुल यांचे कौतुक केले.
:थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचा लोकार्पण कार्यक्रम
पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व पुणे मनपातर्फे सादर केलेल्या थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचा लोकार्पण कार्यक्रम झाला. याप्रसंगी कोनशिलाचे अनावरण करताना पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आबा बागुल, उल्हास पवार, रमेश बागवे, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), उपमहापौर सुनीता वाडेकर, मोहन जोशी, सौ. जयश्री बागुल इत्यादी उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आबा बागुल यांची पाठ थोपटली. चव्हाण पुढे म्हणाले, १९७१ चे युद्ध म्हणजे पहिले निर्णायक युद्ध होते. जे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकले होते. शिवाय याच युद्धात भारताला रॉ सारखी गुप्तचर संघटना देखील मिळाली. या युद्धाची आठवण आबांनी आपल्या सर्वाना करून दिली.
COMMENTS