पीएमपीचे नवे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया
| लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली
पुणे | पीएमपीचे सीएमडी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. आता पीएमपीचे सीएमडी म्हणून ओमप्रकाश बकोरिया काम पाहतील. राज्य सरकारने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
ओमप्रकाश बकोरिया यांनी याआधी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांना क्रीडा व युवक आयुक्त पदी नेमण्यात आले होते. पुण्यातून त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर आता बकोरिया पीएमपीचे सीएमडी म्हणून काम पाहतील. दरम्यान आता तरी पीएमपीच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.