NCP-SCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार | पुणे महानगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकेल असा शहर अध्यक्षांचा विश्वास
| बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार भव्य मेळावा
Sharad Pawar – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन दिनांक १० जून रोजी पुण्यात साजरा होणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे भव्य मेळावा संपन्न होणार आहे. (Pune News)
याबाबत पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना प्रचंड बळ देणारा ठरेल अशी भावना जगताप यांनी व्यक्त केली.
पुणे शहर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचा बालेकिल्ला अधिक भक्कम होईल व कार्यकर्त्यांच्या अफाट ऊर्जेने पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल हा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
COMMENTS