NCP -SCP on Inflation | पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एल्गार आंदोलन

HomeBreaking News

NCP -SCP on Inflation | पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एल्गार आंदोलन

Ganesh Kumar Mule Apr 17, 2025 3:54 PM

Video : Smriti Irani Vs Congress : तोंड उघड बया, तोंड उघड… महागाई विरोधात तोंड उघड
Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा
Edible Oil Price | खाद्यतेल आता अजून स्वस्त होऊ शकते | 16 ऑगस्टला IMC ची मोठी बैठक

NCP -SCP on Inflation | पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एल्गार आंदोलन

 

Pune News – (The Karbhri News Service) – आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती चार वर्षांच्या तुलनेत नीचांकी पातळीवर असूनही केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळत नाही. पेट्रोल, डिझेलची दरवाढ करताना आंतरराष्ट्रीय बाजाराकडे बोट दाखविणारे मोदी सरकार आता दर कमी करण्याबाबत मात्र मूग गिळून गप्प आहे. एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना मोदी सरकार पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. सरकारच्या या वाढत्या महागाई धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुडलक चौक येथे एल्गार आंदोलन करण्यात आले. (Oil Price Hike)

या बाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, पेट्रोल, डिझेलची दरवाढ करताना सरकार आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दराकडे बोट दाखवते. परंतु, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर (प्रती बॅरल$65.41) नीचांकी पातळीवर घसरले आहेत. मात्र, सरकारकडून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा दिला जात नाही. केवळ निवडणुकीचे राजकारण करण्यात आणि निवडणुकांवेळीच पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात सरकार धन्यता मानत आहे. एवढे कमी की काय म्हणून गॅस सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

रेटिंग एजन्सीनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर ₹12 – 15 आणि डिझेलवर प्रति लीटर ₹6.12नफा कमावत आहेत. असे असूनही, तेल कंपन्यानी गेल्या एक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे.

हे सरकार केवळ धनदांडगे, उद्योगपती यांचे भले करण्यात मश्गुल असून, सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारच्या या वृत्तीचा निषेध करण्यात आला.

‘मोदी सरकार चोर है’, ‘रद्द करा, रद्द करा, पेट्रोल – डिझेल दरवाढ रद्द करा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

या आंदोलनास माझ्यासह, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती जगताप यांनी दिली.