NCP- SCP | महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक   | तीन तोंडाच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा निषेध

HomeBreaking News

NCP- SCP | महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक | तीन तोंडाच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा निषेध

Ganesh Kumar Mule Oct 14, 2024 9:16 PM

Big changes from 1st June | या 6 मोठ्या बदलामुळे तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार | जाणून घ्या मोठे बदल
Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले
PMC Employees | Strike | सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु! | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद

NCP- SCP | महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

| तीन तोंडाच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा निषेध

 

Pune News – (The Karbhari News Service)  – महिलांवरील अत्याचाराने संपूर्ण राज्यात कळस लागलेला असताना पुणे शहरातही गेल्या दोन महिन्यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यातील मुंढवा भागात एका तीन वर्षीय बालिकेवर 32 वर्षांच्या एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना काल घडली. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेत शहराध्यक्ष प्रशांत जगताप व महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे यांच्या नेतृत्वात गुडलक चौक येथे आंदोलन केले.

तीन पक्षांच्या महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीन तोंडाच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. महाराष्ट्रातील माता भगिनींची सुरक्षा करण्यात महायुती सरकारचा असेल अपयशी ठरले असून या सरकारने तातडीनेपायउतार व्हावे असे आवाहन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला व महिलांवरील अत्याचारांना आळा घालावा यासाठी प्रशांत जगताप व स्वाती पोकळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप, स्वाती पोकळे,रवींद्र मालवडकर, वैशाली थोपटे,उदय महाले, गणेश नलावडे, राजश्री पाटिल, वंदना मोड़क, आशाताई साने, रूपाली शेलार, नीता गलाडे, रोहन पायगुड़े यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.