राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे
२०१४ साली अवघ्या ५ रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून ३६५ रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल १००२ रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले.
स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत , घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ” महागाई ची राणी, स्मृती इराणी” , ” स्मृती भाभी जवाब दो” , ” बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी बोलतांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.२०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.”
हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जेष्ठ नेंते अंकुश काकडे, वैशाली नागवडे,प्रदीप देशमुख,बाळासाहेब बोडके,निलेश निकम, किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,उदय महाले,गणेश नलावडे,विक्रम जाधव,मानली भिलारे,राजू साने, कार्तिक थोटे , अनिता पवार,वैशाली थोपटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS
ssl certicate nahi ghetale ka?