Navratri Festival | नवरात्र उत्सवानिमित्ताने काशेवाडी येथे महिलांच्या हस्ते भव्य महाआरती

Homecultural

Navratri Festival | नवरात्र उत्सवानिमित्ताने काशेवाडी येथे महिलांच्या हस्ते भव्य महाआरती

Ganesh Kumar Mule Oct 10, 2024 3:00 PM

Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न
Tushar Patil BJP | सिनरजी इमारतीच्या बांधकामात विकसकाने अनियमितता केली असल्याची तुषार पाटील यांची तक्रार | महापालिका शहर अभियंता यांच्याकडे कारवाईची केली मागणी 
Chadrakant Patil | कलेच्या सादरीकरणाने भारावलेल्या चंद्रकांत दादांची कलाकारांना अनोखी भेट

Navratri Festival | नवरात्र उत्सवानिमित्ताने काशेवाडी येथे महिलांच्या हस्ते भव्य महाआरती

 

Archana Tushar Patil – (The Karbhari News Service) – नवरात्र उत्सवाच्या पवित्र पर्वानिमित्ताने काशेवाडी भागातील अशोक तरुण मंडळ आणि अण्णा भाऊसाठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीत परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि भक्तिमय वातावरणात आरतीत सहभागी झाले.

यावेळी भाजपा कसबा मतदारसंघाचे समन्वयक व स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने, प्रभाग क्रमांक १९ च्या माजी नगरसेविका अर्चना पाटील, तसेच भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील उपस्थित होते. या सोहळ्याला अशोक तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काशेवाडीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाआरतीचे आयोजन भक्तिमय वातावरणात पार पडले. मंडळाचे यंदाचे हे ५१ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हस्ते महाआरतीचा उपक्रम राबविला जातो. प्रभाग १९ च्या मा. नगरसेविका अर्चनाताई तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. यावर्षी सुमारे चारशे महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ‘सर्व स्तरातील महिलांना आरतीचा सन्मान मिळावा, त्यानिमित्ताने एकत्र येत उत्सव साजरा व्हावा या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केल्याचे’ अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित देवीभक्त महिलांनी या सन्मानाबद्दल मंडळाचे आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0