Naval Kishore Ram IAS | शहराच्या हितासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही | महापालिका आयुक्त नवल किशोर राम

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | शहराच्या हितासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही | महापालिका आयुक्त नवल किशोर राम

Ganesh Kumar Mule Nov 11, 2025 7:38 PM

Encroachment action at night : आता रात्री देखील अतिक्रमण कारवाई! 
Encroachment action : विरोध झाल्याने रात्री १० नंतर अतिक्रमण कारवाई नाही  : दुपारी २ ते १० अशी कारवाई होणार 
Encroachment Action PMRDA | सात द‍िवसात ४१६ अतिक्रमने न‍िष्कास‍ित | अजित पवार यांच्या आदेशानुसार  वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी  पुढाकार

Naval Kishore Ram IAS | शहराच्या हितासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही | महापालिका आयुक्त नवल किशोर राम

 

Pune Encroachment – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहर अतिक्रमण मुक्त करण्याचे ठरवले आहे. तसेच शहर हित साधण्यासाठी अतिक्रमण कारवाई अधिक कडक करण्याचा मानस देखील बोलून दाखवला आहे. शिवाय शहराचे हित साधताना नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही, असे महापालिका आयुक्त यांनी म्हटले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले आहेत मात्र यामुळे विविध चर्चांना देखील उधाण आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विकास विभागाच्या वतीने शहरात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. दरम्यान काही भागात या आधी कारवाई झाली नाही मात्र आता जोरदार कारवाई झाली आहे. शिवाय या बाबत महापालिका अधिकारी पत्रकारांना दमदाटी ची भाषा करतात याबाबत पत्रकारांनी महापालिका आयुक्त यांना छेडले. यावेळी महापालिका आयुक्तांनी इशारा दिला कि शहरातील कुठलाही भाग असो किंवा कुणाचेही अतिक्रमण असो शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अतिक्रमण कारवाई अधिक कडक केली जाणार आहे. आमच्याकडे तक्रार आली की आम्ही कारवाई करणार आहोत. आयुक्त म्हणाले की, शहराचे हित साधण्यासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही नियम पाळत बसलो तर शहराचे हित साधण्यासाठी खूप वर्ष जातील. त्यामुळे नियमांचा विचार न करता आम्ही अतिक्रमणवर कारवाई करणार आहोत. महापालिका आयुक्तांच्या या भूमिकेमुळे मात्र अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0