Naval Kishore Ram IAS | मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई | महापालिका आयुक्त यांचा इशारा 

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई | महापालिका आयुक्त यांचा इशारा 

Ganesh Kumar Mule Jan 13, 2026 7:43 PM

Sanitation in Vijayastambh area | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम |डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग
पुणे महापालिकेला करावा लागणार ‘पाणी नियोजन आराखडा’ | राज्य सरकारचे निर्देश
Water Closure | सिंहगड रोड, हडपसर परिसरात गुरुवारी पाणी बंद! 

Naval Kishore Ram IAS | मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई | महापालिका आयुक्त यांचा इशारा

 

PMC Election Voting – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निडणूकीसाठी दिनांक १५ जानेवारी  रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल. असा इशारा महापालिका आयुक नवल किशोर राम यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि,  निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी

सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी/ व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य से अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल. असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: