Mula mutha River beutification | मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विदयार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप

HomeBreaking Newsपुणे

Mula mutha River beutification | मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विदयार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप

Ganesh Kumar Mule Jan 25, 2023 4:05 PM

Pune | Traffic Congestion | गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन  | मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत 
PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान 

मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विदयार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप

पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या मुळा मुठा नदी सुधार व सुशोभीकरण योजनेसंदर्भातील त्रुटी व धोके राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आपल्या निदर्शनास आणले होते. यासाठी पुणेकर नागरिक व पुणे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तज्ञाकडून सदर प्रकल्पाचे सादरीकरण देखील आयोजित केले होते. या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आम्ही आपणास वारंवार सूचित करत आलो आहे. राज्य शासनाच्या पातळीवर देखील अनेक तज्ञ पुणेकरांच्या वतीने या शंका मांडल्या गेल्या होत्या व जोपर्यंत या शंकाचे निरसन होत नाही तोपर्यंत सदर नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवावे असे ठरले असता, आता दुर्दैवाने पुणे मनपाच्या वतीने सदर प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरु आहे. असा आरोप खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

खासदार चव्हाण म्हणाल्या, काही नागरिकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे कि पुणे महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत योजनेस नागरिकांचा पाठिंबा असल्याचे दर्शवण्यासाठी नागरिकांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे. असा प्रयत्न अत्यंत धक्कादायक व निंदनीय आहे. पुणे शहरातील इतर महत्वपूर्ण प्रकल्पासाठी नागरिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत व त्यांच्या भावनेचा कुठेच आदर केला जात नाही. मात्र आता लहान मुलांना वेठीस धरून बक्षिसांची आमिष दाखवून, त्यांची दिशाभूल करून त्यांचा माध्यमातून त्यांच्या पालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत असून ते चुकीचे व आक्षेपार्य आहे.

हा प्रकल्प मुळात तांत्रिक दृष्ट्या सदोष असल्याने व त्यामुळे पुणेकरांवर गंभीर नैसर्गिक संकट ओढण्याची शक्यता असल्याने सदरचा प्रकल्प नागरिकांच्या पाठींब्याने होत आहे असे दर्शविण्याचा प्रशासनाचा अट्टहास दिसत आहे. आमची विनंती आहे कि हि मोहीम महानगरपालिकेने ताबडतोब मागे घ्यावी.

सदर पत्रकार परिषदेस खा. वंदना चव्हाण यांच्यासमवेत, प्रवक्ते प्रदीप देशमुख , नितीन कदम उपस्थित होते