नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!
रविवार रोजी भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनअतिशय आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन: शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, नगरसेवक विलास मडगेरी, मा.नगरसेवक संजयजी वाबळे,जेजुरी देवस्थान अध्यक्ष मा. तुषारजी सहाने, उद्योजक निलेश मुटके, नवनाथशेठ लोखंडे, ज्ञानेश्वर सावंत, मा. उपजिल्हाधिकारी सुभाषचंद्र भोसले, आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार महेशदादा लांडगे म्हणाले”नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रथम वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम असतानाही अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला कार्यक्रमांमध्ये स्थान दिले ही विशेष बाब म्हणावी लागेल!” शाळेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या खूप मोठी व लक्षणीय अशी होती. विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक, परिसरातील नागरिक, नारायण हट शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, नारायण हट शिक्षण संस्थेचे सभासद या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय/महाराष्ट्रीय संस्कृतीवर आधारित कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आले होते. वार्षिकसंमेलनाच्या ठरलेल्या थीमवर आधारित सर्व कार्यक्रम सादर झाले. त्यामध्ये गणपती स्तवन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, भारुड, गवळण, दिंडी, लावणी, वाघ्या मुरळी, महाराष्ट्राची लोकधारा,मंगळागौर, राष्ट्रभक्तीवर आधारित नृत्य, शेतकरी नृत्य, पशुपक्षांची शाळा, पालक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केली.
विशेषता पालक मातांकडून सादर करण्यात आलेल्या “मंगळागौर”चा कार्यक्रम विशेष प्रेक्षणीय ठरला. यामध्ये जवळपास 30 माता पालकांनी सहभाग घेतला होता. पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम अतिशय मोहक आणि आकर्षक ठरले.
कार्यक्रमाची सांगता डॉ.रोहिणी गव्हाणे यांच्यासुमधुर आवाजातील “पसायदानाने” झाली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, सायली संत, मीनल पाटील, हरिभाऊ असदकर, प्रियांका लोहारकर,वेदांत कुऱ्हाडे, सानिका कु- हाडे, ऋतुजा साठे, अश्विनी वायकर, सुरेखाताई मुके, प्रवीण भाकड, या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संयोजन: नारायण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: संदीपजी बेंडुरे, सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, खजिनदार, डॉ. शरद कदम, अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद, शिवराम काळे, मुकुंदराव आवटे, डॉ वसंतराव गावडे, संजय सांगळे, शोभा आरुडे,उज्वला थिटे, रोहिणी पवार, सतीश भालेराव, नारायण हट शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नारायण हट गृह संस्थेचे सभासदांनी विशेष परिश्रम घेतले