Nandini Dhende | नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा आंदोलनाचा इशारा; पाणी पुरवठा अधिकारी अलर्ट | प्रभाग दोन मधील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाहणी

Homeadministrative

Nandini Dhende | नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा आंदोलनाचा इशारा; पाणी पुरवठा अधिकारी अलर्ट | प्रभाग दोन मधील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाहणी

Ganesh Kumar Mule Feb 24, 2026 7:17 PM

Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 
Pan-Aadhaar Link | पॅन कार्डबाबत आयकर विभागाचा सर्वात मोठा इशारा | चुकल्यास पैसे द्यावे लागणार 
MP Supriya Sule | मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

Nandini Dhende | नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा आंदोलनाचा इशारा; पाणी पुरवठा अधिकारी अलर्ट | प्रभाग दोन मधील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाहणी

 

PMC Ward 2 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना दिलेल्या लेखी निवेदनाची तात्काळ दखल घेत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित भागाची पाहणी करत दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. (PMC Water Supply Deparment)

समता नगर (महाराष्ट्र हौसिंग बोर्ड), नागपूर चाळ, विद्यानगर, टिंगरेनगर, शांतिनगर, चव्हाण चाळ आदी परिसरांत मागील सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. पाणी वेळेवर न येणे, कमी दाबाने येणे आणि वारंवार खंडित होणे या समस्यांमुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून परिस्थिती अधिक गंभीर बनली असून अनेक भागांतील नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी पाणीपुरवठा विभागाकडे लेखी निवेदन देत दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी—केळकर, ऐकनाथ गाडेकर, नगरे व लतिका मस्के—यांनी प्रभाग क्रमांक २ मध्ये भेट देऊन प्रत्यक्ष आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या समजून घेत आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने हाती घेण्यात येतील व दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

आता प्रशासनाच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात कितपत सुधारणा होते, याकडे प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: