Corona Security Cover : Pune Municipal Corporation : महापालिकेच्या सुरक्षा कवच योजनेचा कर्मचाऱ्यांच्या वारसांना होतोय फायदा 

HomeBreaking Newsपुणे

Corona Security Cover : Pune Municipal Corporation : महापालिकेच्या सुरक्षा कवच योजनेचा कर्मचाऱ्यांच्या वारसांना होतोय फायदा 

Ganesh Kumar Mule Mar 19, 2022 12:05 PM

PMC : पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता!  : राज्य सरकारचे परिपत्रक प्रसिद्ध 
Precautionary dose | महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा  | प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन 
Khadakwasla Dam | खडकवासला धरणाचे पाणी दूषित असल्याचे राज्य सरकारने देखील केले मान्य | पुणेकरांसाठी धोक्याची घंटा

महापालिकेच्या सुरक्षा कवच योजनेचा कर्मचाऱ्यांच्या वारसांना होतोय फायदा

: 60 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!

: अजून 18 वारसांना दिले जाणार अर्थसाहाय्य

पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते. मात्र महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य दिले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. यासाठी कुठलेही निकष नसतील. फक्त रुग्णालयाचे सर्टिफिकेट लागेल. त्यानुसार यासाठी 84 कर्मचारी पात्र होत आहेत. महापालिकेने आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख दिले आहेत. 3 कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून मदत मिळाली आहे. बाकी 18 लोकांना लवकरच हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांनी दिली.
 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका
 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली आहे.  महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाईल.  महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले आहे.  कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले आहेत.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 1 कोटीची आर्थिक मदतदिली जाईल.  जर वारसला नोकरी हवी असेल तर नोकरी आणि 75 लाखांची मदत दिली जाईल.  या योजनेशी संबंधित सर्व अधिकार कामगार कल्याण निधी समितीकडे असतील.  या योजनेत दोन टप्पे होते. त्यानुसार केंद्राच्या योजनेत न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटी दिले जाणार होते. तर त्या योजनेत बसणाऱ्या लोकांना 50 लाख दिले जाणार होते. मात्र केंद्राकडून थोड्याच लोकांना मदत मिळाली आहे. राज्य सरकारने तर आपले हात वर केले होते.

 – आतापर्यंत 95  कर्मचाऱ्यांचा मृत्यू

  या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  आतापर्यंत 95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे.

: 57 वारसांना नोकरी

याबाबत दौंडकर यांनी सांगितले कि एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारी तर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 60 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे. दौंडकर पुढे म्हणाले, उर्वरित 22 पैकी 4 लोकांची फाईल सक्सेशन सर्टिफिकेट मुळे पेंडिंग आहे तर 18 लोकांना लवकरच ही मदत दिली जाईल. दौंडकर पुढे म्हणाले, महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे.
60 कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेने 50 लाखाची मदत त दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे. दौंडकर पुढे म्हणाले, उर्वरित 22 पैकी  18 लोकांना लवकरच ही मदत दिली जाईल. तर महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे.
: शिवाजी दौंडकर, मुख्य कामगार अधिकारी
—–
 कोरोनाने मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाचा पाठपुरावा केला. मुख्य सभेत देखील आवाज उठवला. वारसांना मिळत असलेली मदत पाहून आम्ही समाधानी आहोत.
: दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्ष नेत्या, महापालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2