महापालिका मेडिकल कॉलेज : ७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण!
: प्रवेश प्रक्रियेचा आज अंतिम दिवस
पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) अखेर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) मान्यता दिली आहे. विद्यापीठाने महापालिकेला affiliation दिले आहे. मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाले आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज सुरु करण्याची सगळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान महापालिकेने सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. दोन दिवसात जवळपास ७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया (Admission Process) पूर्ण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेचा आज अंतिम दिवस आहे. १०० विध्यार्थ्याचे प्रवेश महापालिकेला करायचे आहेत. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ अंजली साबणे यांनी दिली.
: पुढील आठवड्यात सुरु होऊ शकते कॉलेज
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने ३० मार्च ही मुदत दिली होती. त्यानुसार महापालिकेने वेग वाढवत ही प्रक्रिया पूर्ण करत आणली आहे. यामध्ये १५ जागा या institutional quota साठी असतील. ज्याची फी ही २१ लाख ८० हजार अशी आहे. open category साठी फी ७ लाख ४३ हजार ६०० एवढी आहे. VJ\NT category साठी फी १ लाख १ हजार २३६ आहे. EWS category साठी फी ३ लाख ९३ हजार ६०० अशी आहे. तर SC\ST category साठी फी ३७ हजार ६०० एवढी आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होत आहेत. दरम्यान प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर लगेच कॉलेज सुरु करण्याचा मानस कॉलेज प्रशासनाचा आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात देखील कॉलेज सुरु होऊ शकते, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन- एनएमसी) मान्यता दिल्यानंतर राज्य शासनाने (State Government) देखील जीआर (GR) काढून २०२१-२२ म्हणजेच यंदापासूनच एमबीबीएसच्या (MBBS) प्रथम वर्षाचे प्रवेश प्रक्रिया (Admission Process) राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर नाशिकच्या MUHS (Medical University Of Helath Science) ने कॉलेजच्या Head count ची तपासणी करत क्लास, प्रयोगशाळा, होस्टेल ची पाहणी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला अंतिम मान्यता दिली आहे.
COMMENTS