महापालिका निवडणूक बाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडणार होती. ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 4 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात
सुनावणी पार पडले.
ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं निवडणुकांच्या तारखा आणि प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनाणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र ही सुनावणी अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आता 4 मे रोजी या प्रश्नावर निकाल लागतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान राज्य सरकारने या आधीच सर्व महापालिकांना पत्र पाठवून प्रभाग रचने बाबत तयारी करायला सांगितले होते. मात्र महापालिकांनी त्याबाबत कुठलीही हालचाल सुरु केलेली नाही. यावरून मात्र इच्छुक लोकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
COMMENTS