Mundhwa Kharadi Flyover |  मुंढवा – खराडी प्रवास होणार वेगवान – उड्डाणपुलाला मान्यता, मेट्रोचाही अंतर्भाव

Homeadministrative

Mundhwa Kharadi Flyover |  मुंढवा – खराडी प्रवास होणार वेगवान – उड्डाणपुलाला मान्यता, मेट्रोचाही अंतर्भाव

Ganesh Kumar Mule Mar 17, 2026 8:51 PM

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ४ निर्णय जाणून घ्या!
PM Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
PMC Pune Employees Transfer | बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा अजूनही अहवाल नाही  | खातेप्रमुखांना धरले जाणार जबाबदार 

Mundhwa Kharadi Flyover |  मुंढवा – खराडी प्रवास होणार वेगवान – उड्डाणपुलाला मान्यता, मेट्रोचाही अंतर्भाव

– स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास  या  रस्त्यावर महात्मा फुले चौकात उड्डाणपूल उभारण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. या प्रकल्पातच प्रस्तावित  मेट्रो मार्गिकेचाही अंतर्भाव केला जाणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune Breaking News)

भिमाले म्हणाले, या एकूण  १०८० मीटर लांबीच्या पुलावरील मुख्य पूल ७९६ मीटर लांबीचा असेल. खराडीच्या बाजूस १३६ मीटर तर मुंढव्याकडील बाजूस १४८ मीटरचे ॲप्रोच रस्ते असतील. हा पूल १६ मीटर (दोन्हीकडे आठ मीटर) रुंद असेल. पुलावर ३६ पीअर्स असतील त्यातील २८ रस्त्यावर तर ८ नदीपात्रात असतील. उड्डाणपुलाचा खर्च, वस्तू व सेवा कर, रॉयल्टी फी व गुणवत्ता तपासणी आदीचा विचार करून तडजोडीने १२६ कोटी ६३ लाख ३६ हजार १०३ रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे.

‘शहरातील मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारने मेट्रोच्या विस्ताराला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार मगरपट्टा ते खराडी मार्गावर मेट्रोचा प्रस्ताव आहे.  वाहने व मेट्रो यासाठी हा एकात्मिक दुमजली पूल असेल. महामेट्रो प्रशासनाशी चर्चा करून काम केले जाणार आहे.  खालून वाहने तर वरून मेट्रो धावेल,’असे भिमाले म्हणाले.

——-

या प्रकल्पामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या पुलाचे काम दोन वर्षात (पावसाळा वगळून) पूर्ण केले जाईल.

श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: