Mumbai-Pune Expressway | उद्या पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद
| मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
Mumbai-Pune Expressway | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम (Highway Traffic Management System) अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद (ब्लॉक) राहणार आहे. (Pune News)
या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मॅजिक पॉइंट किमी क्रमांक ४२/१०० येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किमी क्रमांक ३९/८०० येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.
गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या दूरध्वनी क्रमांक ९८३३४९८३३४ वर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.