Mukhymantri Yojanadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
Maharashta News – (The karbhri News Service) – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २ हजार ४०८ योजनादूत नेमण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी https://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड करण्यात येणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अधिवासाचा दाखला, आधारसंलग्न बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
COMMENTS