MP Suspension | Pune Congress | १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण | अरविंद शिंदे

HomeBreaking Newsपुणे

MP Suspension | Pune Congress | १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण | अरविंद शिंदे

कारभारी वृत्तसेवा Dec 22, 2023 3:36 PM

Mahatma Gandhi Jayati | महात्मा गांधीचे विचार कधीच संपू शकत नाही | अरविंद शिंदे
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे
Pune : Congress Vs BJP : पुणे शहर काँग्रेसला खिंडार : कॉंग्रेस नेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

MP Suspension | Pune Congress | १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण | अरविंद शिंदे

 

MP Suspension | Pune Congress | भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे.  हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोकर हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाची भूमिकेबाबत निवेदन स्पष्ट करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे. यांच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन घेण्यात आले. (Pune News)

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की संविधानाची पायमल्ली करून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचे भाजप सरकारने केलेले निलंबन हा एक लोकशाही वरील अभूतपूर्व हल्ला असून ही एक प्रकारची लोकशाही तत्वाची नग्न हत्या आहे.तसेच लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होताना दिसते. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात व आगामी काळात आपल्याला संविधान अबाधित ठेवायचे असेल तर आता आपल्याला पहिल्या पेक्षा जास्त ताकतीने एकत्रितपणे भाजप सरकारला कडाडून विरोध करण्याशिवाय गत्यंतर नाही, अन्यथा हे RSS प्रणीत भाजप सरकार लोकशाहीचा मुडदा पाडल्यशिवाय स्वस्थ बसणार नाही.

यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील, माजी गृहमंत्री रमेशदादा बागवे , माजी आमदार मोहन जोशी, अनंतराव गाडगीळ, दिप्ती चवधरी, संगिता तिवारी, तसेच आप पक्षाचे सुदर्शन जगदाळे आदिंची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर,कमल व्यवहारे, अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राजेंद्र भुतडा, मेहबूब नदाफ , महिला अध्यक्षा पूजा आनंद, प्रियंका रणपिसे, संगिता पवार,द.स.पोळेकर, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, विशाल जाधव, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, दिलीप तुपे,अजित जाधव,विजय खळदकर,समीर शेख,प्रकाश पवार,शिलार रतनगिरी, आशुतोष शिंदे,सुंदरा ओव्हाळ,सीमा सावंत, सोनिया ओव्हाळ,छाया जाधव , ऍड अश्विनी गवारे, ज्योती परदेशी ,नलीनी दोरगे, वाल्मिक जगताप, अभिजित महामुनी, अविनाश अडसूळ,राज गेहलोत, सुरेश चौधरी,रवि ननावरे, सीमा महाडिक, कृष्णा सोनकांबळे,सचिन सावंत आदिंसह. असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार विठ्ठल गायकवाड यांनी मानले