Mohan Joshi | महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

HomeBreaking News

Mohan Joshi | महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule May 12, 2025 4:26 PM

Pune Municipal Corporation (PMC) – कोविड काळात  पुणे महापालिकेला  दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून!
Pune Talwade Incident | विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट
GPA | जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड

Mohan Joshi | महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

 

Harijan Sevak Sangh – (The Karbhari News Service) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News)

हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.

हरिजन सेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९३ वर्षे झाली आहेत. ही संस्था शताब्दी कडे वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सेवक संघात सर्व जाती धर्माच्या युवक, युवतींचा सहभाग वाढावा, त्यादृष्टीने प्रयत्न रहातील आणि युवा वर्गाकडून नवनवीन कल्पना घेऊन कार्याला आधुनिकतेची जोड दिली जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.

गांधीवादी नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद अनेक वर्षे भूषविले आणि सेवक संघाच्या महाराष्ट्रातील कार्यात मोलाचे योगदान दिले. हरिजन सेवक संघाचा कारभार आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरला असून, अनेक विचारवंत, संशोधक, सामाजिक आणि राजकीय नेते यात सहभागी आहेत.