MLA Sunil Tingre | येरवडा, गांधीनगर भागात २ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

येरवडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना आमदार सुनिल टिंगरे.

HomeBreaking News

MLA Sunil Tingre | येरवडा, गांधीनगर भागात २ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Ganesh Kumar Mule Sep 04, 2024 8:33 PM

Nagar Road BRTS | नगर रस्ता सिग्नल फ्री करणार |आमदार सुनिल टिंगरे
MLA Sunil Tingre | अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा | पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली
Ajit Pawar | लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

MLA Sunil Tingre | येरवडा, गांधीनगर भागात २ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

| आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते उद्घाटने

 

Vadgaonsheri Vidhansabha – (The Karbhari News Service) – वडगाव शेरी मतदार संघातील येरवडा – गांधीनगर भागात २ कोटी ४० लाखांच्या विविध विकासकामांचा आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सामाजिक सभागृह, ड्रेनेज लाईन, समाज मंदिर, बुध्द विहार अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि आमदार स्थानिक विकास निधीतून ही कामे होणार आहेत. या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, येरवडा भागात सर्व जाती धर्मांचे नागरिक राहतात. प्रामुख्याने सर्वसामान्य वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी या भागात त्या अनुषंगाने विकासकामे हाती घेण्यात आली. या भागात भाजी मंडईचा प्रश्न होता. लवकरच येथे सुसज्ज भाजी मंडई उभी राहील. तसेच अन्य विकासकामेही आगामी काळात सुरु होतील.

यावेळी आमदार टिंगरे यांच्या हस्ते येरवडा येथील वडारवाडी शितळा देवी मंदिराशेजारी सामाजिक सभागृह, अहिल्या पर्णकुटी येथे वाल्मिकी समाज सभागृहाचे उर्वरित बांधकाम, अशोकनगर येथील बुद्ध विहाराचा पहिला मजला बांधकाम, समता मित्र मंडळाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम, जनसेवा मित्र मंडळ कामराज नगर येथे सामाजिक सभागृह, तिरंगा मित्र मंडळाच्या लगतच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम, जयशक्ती मित्र मंडळालगतच्या समाज मंदिराचे उर्वरीत काम, दुर्गाकाली माता प्रतिष्ठान जवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, नवी खडकी सुभाषनगर येथे सामाजिक सभागृह बांधणे, माणिकनगर याठिकाणी वाघरी समाज सभागृहाचे बांधकाम, दक्षिणमुखी गणपती मंदिराशेजारी सामाजिक सभागृह बांधकाम, यशन्वतनगर येथील सामाजिक भवन, छत्रपती संभाजी महाराज चौक लक्ष्मीनगर येथे सामाजिक सभागृह आणि पर्णकुटी पायथा येथील समाज मंदिराचे बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.
——————————————————-