MLA Sunil Kamble | ससून हॉस्पिटल परिसरात नवी पोलीस चौकी | आमदार सुनील कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश 

HomeBreaking News

MLA Sunil Kamble | ससून हॉस्पिटल परिसरात नवी पोलीस चौकी | आमदार सुनील कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश 

Ganesh Kumar Mule Jun 17, 2025 8:49 PM

Pune Shivsena | भारतीय सेनेच्या शौर्याला हडपसरमध्ये मिठाई वाटून सलाम!
Property Tax | PMC | पहिल्या दोन महिन्यांत 751 कोटी मिळकतकर जमा  : मागील वर्षी पेक्षा 190 कोटींनी अधिक 
Shivajinagar Bus Station | शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे; राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे

MLA Sunil Kamble | ससून हॉस्पिटल परिसरात नवी पोलीस चौकी | आमदार सुनील कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश

 

Sasoon Police Chowki – (The Karbhari News Service) – बंडगार्डन अंकित ससून हॉस्पिटल परिसरात नवी पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचं उद्घाटन आज आमदार सुनील कांबळे  आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पार पडले. (Pune News)

यावेळी आमदार कांबळे म्हणाले,  पुणेकरांच्या सुरक्षेच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल सुरु आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार तसेच  पुणे पोलीस आयुक्त मा.अमितेश कुमार यांचेही विशेष आभार. कांबळे म्हणाले, या महत्त्वपूर्ण योजनेमुळे हॉस्पिटल परिसरात आता अधिक सुरक्षितता आणि नियंत्रण राहणार आहे. या यशस्वी उपक्रमामागे मुख्यमंत्री  फडणवीस  यांचं मार्गदर्शन आणि माझा पाठपुरावा मोलाचा ठरला आहे. ही फक्त एक सुरुवात आहे. सुरक्षित पुण्यासाठी आमचा लढा असाच सुरू राहणार,जनतेच्या हितासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत. असे देखील कांबळे म्हणाले.