MLA Ravindra Dhangekar | जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी काँग्रेस कटीबद्ध | आमदार रविंद्र धंगेकर

HomeBreaking Newsपुणे

MLA Ravindra Dhangekar | जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी काँग्रेस कटीबद्ध | आमदार रविंद्र धंगेकर

Ganesh Kumar Mule Jun 27, 2023 12:44 PM

GPA Megagypicon Conference | फॅमिली डॉक्टर संकल्पना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. : पद्मविभूषण डॉ. सुरेश अडवाणी | जीपीए मेगाजिपीकॉन परिषदेचे उद्घाटन
CM Medical Assistance Fund | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे
The Obesity code Book Review | वजन कमी करण्याचे रहस्य हवंय तर डॉ. जेसन फंग यांचे ‘द ओबेसिटी कोड’ हे पुस्तक वाचा | काय खावे, कसे आणि कधी खावे हे पुस्तक तुम्हाला शिकवेल!

MLA Ravindra Dhangekar | जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी काँग्रेस कटीबद्ध | आमदार रविंद्र धंगेकर

| आरोग्य कार्ड वाटपाच्या सोमजी यांच्या उपक्रमाची प्रशंसा

MLA Ravindra Dhangekar | सामान्य नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी (Health Protection) काँग्रेस पक्ष (Congress Party) कटिबद्ध असून, शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे, असे उदगार आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी काल (सोमवारी) शासकीय योजनांच्या कार्ड वाटप कार्यक्रमात बोलताना काढले. (MLA Ravindra Dhangekar)
शासनाच्या विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नरुद्दीन सोमजी यांनी भवानी पेठ, नाना पेठ परिसरात सुविधा केंद्र चालू केले आहे. महिन्याभरात चारशेहून अधिक नागरिकांनी सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी नांवे नोंदविली आहेत. सोमवार दिनांक २६जून २०२३ रोजी अहिल्याश्रम हॉल, नाना पेठ येथे लाभार्थींना विविध योजनांची कार्ड्स आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार रविंद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (Pune News)
जनतेच्या हितासाठी सोमजी यांनी चांगला उपक्रम राबविला आहे. पाच लाखापर्यंतच्या आरोग्य विमा योजनेचा लाभही जनतेला मिळवून दिला आहे. सामान्य लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा संदेश यातून देण्यात आलेला आहे. हे कार्य काँग्रेस पक्ष पुढेही चालू ठेवेल, असे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
शहराच्या पूर्व भागातील लोकांना आरोग्य विमा कार्ड, आधार कार्ड,  पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड मिळवून देण्याचे उपयुक्त काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबविले जात आहे, असे सांगून मोहन जोशी यांनी नरुद्दीन सोमजी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. काँग्रेस पक्षाने गोरगरीब वर्गाला, कष्टकऱ्यांना नेहमीच साथ दिलेली आहे. काँग्रेस हाच या वर्गाचा आधार आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले. (Pune Congress)
स्वर्गीय अलीभाई सोमजी यांनी कष्टकरी आणि गोरगरीब वर्गाला नेहमीच मदत केली होती. वडिलांचा वारसा नरुद्दीन सोमजी नेटाने पुढे चालवीत आहेत. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळायला हवी. मला खात्री आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून सोमजी यशस्वी होतील आणि जनतेची सेवा करतील, असा विश्वास माजी मंत्री रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, विरेंद्र किराड, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या चिटणीस डॉ.वैष्णवी किराड, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस रमेश अय्यर, गौरव बोराडे, शानी नौशाद, वाल्मिक जगताप, कान्होजी जेधे, सुरेश कांबळे, विशाल शेवाळे, लेखा नायर, महेंद्र कांबळे, भीमराव कांबळे, प्रमोद गायकवाड, आकाश दांगुळे, प्रमोद मुळे, इजाज सय्यद आदी उपस्थित होते.
——
News Title | MLA Ravindra Dhangekar |  Congress is committed to protecting the health of the people  MLA Ravindra Dhangekar