मला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या कामाला निधी वर्ग केला
: आमदार माधुरी मिसाळ यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
पुणे : भाजपच्या पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांची महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. पथ विभागाकडून मिळालेला निधी मला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या कामाला वर्ग केला आहे. असा आरोप आमदार मिसाळ यांनी केला आहे. शिवाय या कामाची दक्षता समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील मिसाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.
: काय म्हणतात आमदार?
मला पुणे मनपा कडून मिळालेला निधी क्र. CE20A1249/A6-503 (पथ विभाग) हा निधी मला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या कामाला वर्ग केला आहे. आणि पुणे मनपा ने मी सुचवलेल्या कामाची वर्क ऑर्डर झाल्यांनतर अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने दुसऱ्या कामासाठी खर्च केला आहे त्या कामाची दक्षता समिती मार्फत चौकशी करून मला माहिती मिळावी.
COMMENTS