Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

HomeBreaking Newsपुणे

Medha Kulkarni | Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

Ganesh Kumar Mule Aug 11, 2023 1:21 PM

Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 
Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !
Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी! 

Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

| माझ्या कामावर बोळा फिरवला जातोय | कुलकर्णींचा आरोप

Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover |  भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी भाजपला (BJP) घरचा आहेर दिला आहे. आपल्याला डावलले जात असल्याची तक्रार त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. तसेच कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांना अनेक संधीसाठी भाजपकडून डावलण्यात आले. त्यांनी याबाबत वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे नाही तर, अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यात उद्या (दि. 12) चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी फेसबुक पोस्ट लिहीत मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover)

मेधा कुलकर्णीं यांची फेसबुक पोस्ट काय आहे? 

मेधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पोस्टला त्यांनी ” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे ” असे शिर्षक दिले आहे. यात त्या म्हणतात की, माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.

चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.

गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. कारण माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे.

एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

——