Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप
मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने शिव मल्हारी युवा प्रतिष्ठान नवी सांगवी, विद्यानगर नवरात्र महोत्सव महिला मंडळ, दुर्गामाता महिला मंडळ नवरात्र उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ, हस्तलिखित एकनाथी भागवत आणि पाचशे रोपांचे वाटप करण्यात आले.
वृक्षदान चळवळीचा एक भाग म्हणून मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पिंपळ, वड, कडुलिंब, चिंच, नारळ, पेरू, चिकू, रामफळ, कनेरी, मोगरा, जास्वंदी, गुलाब अशी अनेक प्रकारची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी भीमाना हिरेमठ, सोनू शिंदे, रेणुका तलवार, संगीता शिंदे, गंगामा हिरेमठ, लक्ष्मी वनेटी आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की वृक्षवाटप करण्यामागे मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झाला आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्याचे जीवन जगणे सोपे झाले.