मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला व वारकऱ्यांना ग्रामगीतेच्या प्रती भेट
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ वतीने महिला व वारकऱ्यांना संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या १०० प्रती भेट देण्यात आल्या.
श्री गुरुदेव सेवा मंडळ पुणे विभाग यांच्या वतीने देहु येथे युगप्रवर्तक ग्रंथ ग्रामगीता प्रबोधन, कीर्तन, प्रवचन व व्याख्यानाचे, तसेच श्री गुरूदेव अध्यात्म गुरूकुल गुरूकुंज (मोझरी जि.अमरावती) येथून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज तत्वज्ञान प्रचारार्थ कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने ग्रामगीता भेट देण्यात आल्या. यावेळी देहुरोड कन्टोमेंन्ट बोर्डचे प्रशासक कैलास पानसरे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार, डॉ. मनिष धोटे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे विश्वस्त जालिंदर महाराज काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, ग्रामगीता प्रचार अभियान मार्गदर्शक ह.भ.प. नामदेव महाराज गव्हाळे, श्री गुरूदेव अध्यात्म गुरूकुलचे संचालक रवी मानव, सामाजिक कार्यकर्ते नाना काळोखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार ह.भ.प. ऋषिकेश महाराज रेडे, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. विवेक महाराज कुरुमकर, प्रा. आकाश महाराज ताविडे यांचे कीर्तन झाले. सामुदायीक ध्यान चिंतन या विषयावर ह.भ.प. नामदेव महाराज गव्हाळे यांनी विचार व्यक्त केले. प्रसिद्ध गायक अमर ताविडे,व साथसंगत मोहन काळे यांचे खंजिरी भजन झाले. आरती व राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बीज सोहळ्याला श्री गुरूदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र देहुचे अध्यक्ष सुनील निभोंरकर, भजनप्रमुख प्रवीण कुरळकर, श्रीगुरूदेव सेवा मंडळ,पुणे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र नावडे, चिखलीचे अध्यक्ष उल्हास पठाडे, डॉ. सुनील लहाने, राष्ट्रधर्म युवा मंच पुणे अध्यक्षा ग्रामगीताचार्य वैष्णवीताई पोटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच पुणे अध्यक्ष सुरेश देसाई, राजकुमार मांडेकर यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन व आभार सुरेश देसाई यांनी मानले.