Manipur Crisis | Prashant Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली मणिपूरमधील आपत्तीग्रस्त भागात भेट
Manipur Crisis | Prashant Jagtap | ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या (August Kranti Din) निमित्ताने भारताचा अविभाज्य घटक असलेल्या मणिपूरची राजधानी इम्फ़ाल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune City President Prashant Jagtap) यांनी ध्वजारोहण व आप्पत्तीग्रस्त भागास भेट दिली. यावेळी त्यांनी इम्फ़ाल (Imphal) पासून सुमारे ५० किमी अंतरावरील तेरापुर व लिटानपोप्पी या परिसरात जाळपोळ व हल्ले झालेल्या गावांमध्ये भेट दिली तेथील नुकसानीची पाहणी केली.परिसरातील आपत्तीग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. (Manipur Crisis | Prashant Jagtap)
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की,
“मणिपूर राज्यात सध्या घडत असलेल्या घटनांची पार्श्वभूमी अत्यंत विदारक अशी आहे. प्रचंड जाळ- पोळ , हिंसाचार महिलांवरील अत्याचार हे सर्व राजरोसपणे सुरू असलेल्या मणिपूरमध्ये परिस्थिती अतिशय भीषण असताना देखील सरकार म्हणून येथील सरकारने अक्षरश: जबाबदारी झटकलेली आहे. पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीचे वातावरण असून मनिपुर मधील कुठलीही गोष्ट जगासमोर येऊन नये यासाठी इंटरनेट सेवा देखील विस्कळीत करण्यात आली आहे. ठिक -ठिकाणी पोलीस दलातील जवान तैनात असून कुठल्याही प्रकारे मणिपूरमध्ये घडलेला प्रकार जगासमोर येऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मनिपुर येथे येऊन येथील लोकांमध्ये आत्मविश्वास जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्व भारतीय नागरिक एक आहोत. संपूर्ण देश मणिपूरच्या सोबत उभा आहे. मनिपुर सोबत जे घडले आहे ते सरकारने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आपण सर्वजण मिळून सत्य जगासमोर आणणारच या दृढनिश्चयासह आज येथे ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच येथील युवक ,महिला व लहान मुलांना भारतीय राष्ट्रध्वजाचे वाटप केले”. (Manipur violence)
“मणिपूर मधील परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना देशात लोकशाही वाचवण्यासाठी विविध सामाजिक संस्था ,राजकीय पक्ष हे सर्व मणिपूरच्या सोबत आहेत”,हाच संदेश या निमित्ताने आम्हाला द्यावयाचा आहे. असेही जगताप म्हणाले. (Manipur Incident News)
यावेळी माझ्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा,मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष इबोमिया सोराम ,जावेद इनामदार, संदीप बालवडकर, सुषमा सातपुते आदी सहकारी देखील उपस्थित आहेत.
——
News Title | Manipur Crisis | Prashant Jagtap NCP City President Prashant Jagtap visited the disaster affected areas in Manipur