Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अजित पवार यांनी राजीनामा घ्यावा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

HomeBreaking News

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अजित पवार यांनी राजीनामा घ्यावा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

Ganesh Kumar Mule Jul 21, 2025 7:44 PM

Pune DCC Bank | विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा मोठा निर्णय
CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra Budget 2025-26 | अर्थसंकल्पात पुणेकरांसाठी भरीव निधीची तरतूद..!

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अजित पवार यांनी राजीनामा घ्यावा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी

 

Maratha Kranti Morcha – (The Karbhari News Service)  – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ  राजीनामा घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. (Aji Pawar)

याबाबत मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर चे समन्वयक सचिन आडेकर म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री  कोकाटे जी हे विधान भवनात मोबाईलवर पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना निवेदन दिले. यावेळेस त्यांना पत्ते भेट म्हणून दिले या कारणास्तव छावा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी मारहाण केली त्याचा मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध.

आडेकर पुढे म्हणाले, ” महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसताना आणि अवकाळी पाऊस व दुष्काळाची मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या त्रासाची जाणीव नसलेले कृषिमंत्री जर विधानसभेत मोबाईलवर पत्ते खेळत असतील तर अशा कृषी मंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने निलंबित करावे शेतकरी कुटुंबातून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: