बायोमेट्रिक हजेरीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती बंधनकारक
| नोडल ऑफिसरसाठी मंगळवारी कार्यशाळा | उपस्थित राहणे अनिवार्य
पुणे | “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे
महानगरपालिकेमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र यात बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची आलोचना होत आहे. त्यामुळे आता हे सुरळीत करण्यासाठी प्रत्येक विभागात नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय ते प्रत्येक विभागावर बंधनकारक राहणार आहे. तसेच नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरची मंगळवारी कार्यशाळा ठेवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी जारी केले आहेत.
| असे आहेत आदेश
“Aadhar Enable Bio-Metric Attendance System” दैनंदिन हजेरी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. विद्युत विभागाकडून `महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी Bio- Metric Attendance Machine बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. २ च्या आदेशान्वये “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” दैनंदिन हजेरी प्रणाली सुरळीतपणे कार्यान्वित होण्यासाठी सर्व संबंधित विभागप्रमुख / खातेप्रमुख यांनी आपल्या विभाग / कार्यालयामध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती तत्काळ करावयास आदेशित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागप्रमुख यांनी सदर कामी नोडल ऑफिसर नियुक्ती करणे बंधनकारक आहे. सदर नोडल ऑफिसरचे नाव, पदनाम व मोबाईल नंबरची माहिती उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग व मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे मनपा यांना देणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभाग / कार्यालयामध्ये नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसर यांची कार्यशाळा
अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे मार्गदर्शनाखाली २८/०२/२०२३ रोजी दुपारी १२ : ०० वा. आयोजित केली आहे. सदर कार्यशाळेसाठी सर्व संबंधित नोडल ऑफिसर यांनी श्री छत्रपती शिवाजी
महाराज सभागृह (जुना जी. बी. हॉल), तिसरा मजला, मुख्य इमारत, पुणे मनपा येथे उपस्थित राहावे. सदर कार्यशाळेस सर्व संबंधित कार्यालयाकडील नोडल ऑफिसर यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, याची नोंद घ्यावयाची आहे. याबाबतची समज सर्व संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी नोडल ऑफिसर यांना देण्यात यावी.