Mahavikas Aghadi Agitation | शरद पवारांच्या नेतृत्वात पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

Mahavikas Aghadi Agitaion

HomeBreaking News

Mahavikas Aghadi Agitation | शरद पवारांच्या नेतृत्वात पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

Ganesh Kumar Mule Aug 24, 2024 2:52 PM

Badlapur News | मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
BJP Pune Agitation | बदलापूर च्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे महाविकास आघाडी ला शोभत नाही | धीरज घाटे
Maharashtra Band | बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न | आमदार माधुरी मिसाळ

Mahavikas Aghadi Agitation | शरद पवारांच्या नेतृत्वात पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

 

Maharashtra News – (The Karbhari News Service) – बदलापूरसह (Badapur) महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपल्या लेकींवर अत्याचार होत असताना राज्यातील सत्ताधारी मात्र केवळ राजकारणात व्यस्त आहेत असा आरोप करत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. पुण्यातही खा. शरद पवार (Sharad Pawar – NCP SCP) व खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन झाले. (Pune News)

राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांवर राजकारणाचा शिक्का मारताय, सपशेल अपयशी ठरलेले गृहमंत्री गुन्हेगार सोडून आंदोलकांना अटक करताय, दुसरे उपमुख्यमंत्री तर आपल्या गुलाबी स्वप्नातच व्यस्त आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
अशा परिस्थितीत  शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या लेकींसाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट झाली. महाराष्ट्राच्या लेकींसाठी आम्ही लढणार हा निर्धार करत महाविकास आघाडीच्या वतीने आज एक तासाचे मुक आंदोलन करण्यात आले.

शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात व खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे व गजानन थरकुडे, वंदनाताई चव्हाण,  दीप्तिताईं चौधरी, जयदेवराव गायकवाड़, जगन्नाथ शेवाले, आमदार रवींद्र धंगेकर , मोहन जोशी, चंद्रकांत मोकाटे, रमेश बागवे, महादेव बाबर,  बाळासाहेब शिवरकर यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात महात्मा गांधींच्या रघुपति राघव राजाराम या प्रार्थनेचे सामूहिक वाचन केले व शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील लेकींच्या सुरक्षेची प्रतिज्ञा करत आंदोलनाची सांगता झाली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0