Mahatma Phule Jayanti | महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण | पुणे महापालिका या मिळकती तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत  प्रयत्नशील 

Homeadministrative

Mahatma Phule Jayanti | महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण | पुणे महापालिका या मिळकती तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत  प्रयत्नशील 

Ganesh Kumar Mule Apr 11, 2025 9:32 PM

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula Kendra| खडकी परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन
Migration of revenue data | टॅक्स विभागाकडील संपूर्ण मिळकतींच्या डेटाचे क्लाऊड सर्व्हरवर होणार मायग्रेशन  | 6 कोटींचा येणार खर्च | कमांड सेंटर च्या कामातून वर्ग केली जाणार रक्कम 
Teacher Recruitment | शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले

Mahatma Phule Jayanti | महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण | पुणे महापालिका या मिळकती तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत  प्रयत्नशील

Mahatma Phule Wada – (The Karbhari News Service) – पुणे गंज पेठ येथील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण व विस्तारीकरण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  येथील रहिवाशांच्या  मिळकती तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत पुणे महापालिका (Pune Municipal Corporation – PMC) प्रयत्नशील आहे. अशी महिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (Savitribai Phule Smarak)

महात्मा फुले वाडा हा राज्य संरक्षित वास्तू असून पुणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक “सार्वजनिक निमसार्वजनिक” विभागात समाविष्ट आहे. महात्मा फुले वाडा या राष्ट्रीय स्मारकास भेट देणेस वर्षभर राष्ट्रीय नेते व अति महत्वाच्या व्यक्ती येत असतात. मात्र येथे वाहतूक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने पर्यटन व नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे महात्मा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकांचा विस्तार व या वास्तूंसाठी जोड रस्ता आखण्यात आला असून सदर विकसन प्रकरणी भूसंपादन कार्यवाही करणेचा प्रस्ताव प्राप्त आहे. महात्मा फुले वाडा स्मारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यामध्ये  प्रस्तावित आरक्षणाचे क्षेत्र अंदाजे १०, ९४२ चौ.मी. इतके आहे. महात्मा फुले वाडा स्मारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणात एकूण ९१ मिळकती बाधित होत असून त्याचे क्षेत्रफळ ५३१०.०० चौ. मी आहे. तसेच त्यामध्ये मालक ५१६ व भाडेकरू २८५ आहेत.

पुणे शहराच्या मंजूर विकास योजनेतील, पुणे पेठ येथील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकांच्या लगतचे क्षेत्र म्हणजे, भाग नकाशातील A-B-C-D-E-F-A ने सिमांकित क्षेत्रापैकी महात्मा फुले वाडा स्मारकाचे क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्र, महात्मा फुले वाडा स्मारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एकत्रीकरण व विस्तारीकरण म्हणून आरक्षित करणेबाबतचा फेरबदल प्रस्तावास शासन मंजूर मिळाली आहे. प्रस्तावित जागेच्या भूसंपादनासाठी अंदाजे २०० कोटी इतका खर्च अपेक्षित असून निधी उपलब्ध होणेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाकडे  पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.  महापालिका आयुक्त यांनी महात्मा फुले वाडा परिसरातील रहिवाश्यांची पुनर्वसन प्रस्तावाबाबतची त्यांची मागणी समजून घेणेकरिता मिटिंग आयोजित करणेबाबत  उप आयुक्त, परिमंडळ क्र.५ यांना आदेश दिले आहेत.

 

मिटिंग मध्ये  उप आयुक्त परिमंडळ क्र.५ यांनी ०५/०७/२०२४ रोजी बैठक आयोजित करून त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले. तेथील रहिवाशी यांनी घराला घर शहरांमध्ये मिळावे व भाडेकरू यांनी मालकी हक्काचे घर मिळावे हि मागणी केली तसेच प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाला घर मिळावे अशी मागणी केली. १५/०८/२०२४ रोजी  उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी भिडेवाडा आणि महात्मा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक परिसर विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.  महात्मा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण करिता भूसंपादनासाठी लागणारा निधी मे शासनाकडून उपलब्ध होण्याकरिताचा प्रस्ताव मे. शासनाकडे सादर करण्याबाबत मा. मंत्री महोदय यांनी सूचना दिल्या होत्या. भुसंपादनासाठी लागणारी र.रु. २०० कोटीची तरतूद मे. शासनाकडून उपलब्ध करणेत यावी व परिसर विकासासाठीचा खर्च पुणे महानगरपालिकेने करावा अशा सुचना उप मुख्यमंत्री यांनी दिल्या होत्या.

 

पुणे पेठ गंज येथील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण व विस्तारीकरण प्रस्तावाकरिता अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे  महापालिका आयुक्त, पुणे मनपा यांचे मान्यतेने समिती गठीत करणेत आली आहे. गठीत समितीची दि २३ जानेवारी २०२५ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत या प्रस्तावाची भूसंपादन प्रक्रिया चालू करणेबाबत व याकामी प्रस्ताव तयार करून  स्थायी समिती व मुख्य सभा यांचे मान्यतेस प्रस्तावास पाठविणेचे भूसंपादन व व्यवस्थापन विभागास दिले आहेत.

या प्रकल्पासाठी जागेचे भूसंपादन व अनुषंगिक साठी र.रु. २०० कोटी एवढा निधी उपलब्ध करणेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार भूसंपादन प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.  १४ फेब्रुवारी २०२५ महानगरपालिका मुख्य सभा ची  भूसंपादन प्रस्ताव सादर करणेस मान्यता मिळाली आहे.  २१ मार्च २०२५१००.०० कोटी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय प्राप्त झाला आहे.  ०८ एप्रिल २०२५ रोजी प्रस्ताव जा.क्र. LAM- 62 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे तसेच पुणे महापालिका या मिळकती तडजोडीने ताब्यात घेणेबाबत देखील कार्यवाही करत आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.